वैभववाडी आचिर्णे येथील युवकांचा मनसेत प्रवेश…

2

वैभववाडी,ता.२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वैभववाडी संपर्क अध्यश चंद्रशेखर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

माजी तालुका अध्यक्ष सचिन तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. माजी जिल्हा सचिव समिर चिले, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रूपेश वारंग, दिपक पार्टे, विनोद विटेकर, महेश कदम आदी उपस्थित होते. मनसेत प्रवेश करणारे दशरत कदम, शुभम मोरे, कुणाल घाडी, स्वप्नील मोरे, रुपेश शेळके, राहुल परब, दिपक तर्फे, प्रथमेश मांजलकर यांनी प्रवेश केला. तसेच थोड्याच दिवसात अनेक युवकांचा प्रवेश होणार आहे, असे चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

4