अरविंद सावंत; आधी करेन आणि नंतर सांगेन,व्यक्त केला विश्वास…
सावंतवाडी ता.१९: माझ्याकडे अवजड उद्योग मंत्री पद आहे,परंतु अवजड उद्योगाचे अवघड आहे.असे मिश्किलपणे सांगून कोकणातील जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चीतच प्रयत्न करणार आहे.त्यासाठी शेतीपूरक,हॉर्टिकल्चर आणि प्रदूषण मुक्त प्रकल्प या ठिकाणी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.परंतु याबाबत आधी माहिती न देता आधी केले मग सांगितले,अशी माझी भूमिका असेल असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.
श्री.सावंत आज जिल्हा दौऱ्यावर आहेत यानिमित्त त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उपस्थित पत्रकारांनी तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहात मग जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुमची नेमकी भूमिका काय असेल? असा प्रश्न केला.यावेळी ते म्हणाले माझ्याकडे अवजड उद्योग मंत्री पद आहे.परंतु अवजड उद्योगाचे अवघड आह.जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी नेमके काय करावे असा माझ्या मनात प्रश्न सुरू आहे.त्यादृष्टीने शेतीपूरक हॉर्टिकल्चर आणि प्रदूषण मुक्त प्रकल्प या ठिकाणी यावे या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत सद्यस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार कडून रोजगाराच्या संधी देण्यासाठी किंवा रोजगाराचे प्रकल्प उभारण्याची मानसिकता नाही त्यामुळे अश्या गोष्टीत न अडकता सर्वसामान्य लोकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असणार आहेत मात्र यासाठी मी नेमके काय करेन हे आत्ताच सांगणार नाही तर आधी करून दाखविणे आणि नंतरच सांगेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
ते पुढे म्हणाले पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत सद्यस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या मदतीने त्यांना सहकार्य करण्याचे काम सुरू आहे तात्काळ त्यांना सहकार्य व्हावे म्हणून ब्लॅंकेट कपडे आधी विविध वस्तू असलेल्या किट पूरग्रस्तांना वाटप करणार आहोत.त्यानंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल,यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब,रुपेश राऊळ,विनायक ठाकूर,मनोज नाटेकर,गीता परब आदी उपस्थित होते.