भूगर्भ शास्त्रज्ञ व जाणकारांच्या मदतीने दोडामार्ग व सावंतवाडीचा अभ्यास

202
2
Google search engine
Google search engine

आदित्य ठाकरे: हाक दया शिवसैनिक-शिवसेना नक्कीच मदत करेल

दोडामार्ग/सुमित दळवी ता.१९ सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती व भूस्खलन लक्षात घेता,असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची व विशेषता स्थानिक जाणकारांची मदत घेऊन आगामी काळात योग्य तो प्लान बनविण्यासाठी प्रयत्न करू,जेणेकरून कोणाचा जीव जाऊ नये,असे नियोजन करू,अशी हमी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली
कोकणासह सबंध राज्यात यावर्षी पावसामुळे आपत्ती आली.त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही.या साठी शिवसेना प्रयत्न करेल,काही मदत हवी असल्यास शिवसैनिकांना सांगा ते नक्की तुमच्यासाठी धावत येतील असा विश्वासही ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला
श्री ठाकरे यांनी दोडामार्ग येथे पूरग्रस्तां सोबत संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत,जिल्हा प्रमुख संजय पडते आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी श्री ठाकरे म्हणाले लोकांच्या प्रश्नासाठी मी या ठिकाणी आलो आहे. त्यामुळे मी भाषणबाजी न करता लोकांचे प्रश्न ऐकणार आहे आपल्या समस्या काय ह्या उपस्थितांनी मांडाव्यात त्यांच्या या आव्हानाला दाद देऊन उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या दोडामार्ग तालुक्यात नेमके कोणते प्रश्न आहेत हे ठाकरे यांच्यासमोर मांडले.
त्याला उत्तर देताना श्री ठाकरे म्हणाले राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पुरामुळे संकट आले आहे.त्यामुळे अन्य राज्यातील भागासह कोकणावर अन्याय होणार नाही. कोण घरापासून तसेच अन्य गोष्टींपासून वंचित राहणार नाही.याची काळजी शिवसेना घेईल.त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.येणाऱ्या काळात अशा प्रकारचा पुराचा फटका पुन्हा बसू नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासोबत स्थानिक व जाणत्या लोकांच्या सूचना लक्षात घेऊन पुढे असा प्रकार घडू नये आणि घडल्यास जीव वाचला पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून पुढचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये ज्याला कोणाला गरज असेल त्याच्या मागे शिवसैनिक आणि शिवसेना ठामपणे उभी राहील.असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.