दीपक केसरकर:मातीच्या घराबाबतचा जीआर दोन दिवसात निघेल
सावंतवाडी ता.१९: पूरग्रस्तांना पुन्हा एकदा ताठ मानेने उभे राहता यावे यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.पूरपरिस्थिती स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल.असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.
मातीच्या घरांना नुकसान भरपाई देण्याबाबत आवश्यक असलेला शासन अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल.त्यामुळे पावसानंतर कधीही घरे पडली तर त्याला नुकसान भरपाई मिळेल.त्याचबरोबर एरवी हेक्टरी देण्यात येणारी नुकसान भरपाई आता प्रत्येक झाडासाठी वेगळ्या पद्धतीचे देण्यासाठी प्रयत्न आहेत.असेही केसरकर यांनी सांगितले.
श्री.केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले पूर परिस्थितीमुळे सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.कोकणासमवेत राज्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे.त्यामुळे आता अशा नुकसानग्रस्तांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील भूस्खलन झाल्यामुळे स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटुंबांचे निश्चितच पुनर्वसन केले जाईल.त्याचबरोबर कोणाचे नुकसान होणार नाही.याची खात्री घेण्यात येणार आहे ज्याचे नुकसान झाले ती व्यक्ती पुन्हा एकदा ताठ मानेने उभी राहील यासाठी आमचे प्रयत्न असतील.