आरोस येथे झालेल्या सभेत निर्णय; विश्वासात न घेता मनमानी केली जात असल्याचा आरोप…
सावंतवाडी,ता.२४: कबड्डी पट्टूंना विश्वासात न घेता जाहीर करण्यात आलेली जिल्हा कार्यकारीणी तसेच खेळाडूंवर होणारा अन्याय याचा निषेध करीत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या स्पर्धावर जिल्ह्यातील कबड्डीपटूनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशनच्या मनमानीला विरोधकरण्यासाठी जिल्ह्यातील १८ मंडळाच्या खेळाडुंनी आज ओरोस येथे एकत्र येवून बैठक घेतली. यावेळी फेडरेशनच्यावतीने घेण्यात येणार्या स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पंचक्रोशी फोंडाघाट, जय महाराष्ट्र सावंतवाडी, शिवभवानी सावंतवाडी, सिंधुपुत्र कोळोशी, यंगस्टार कणकवली, लक्ष्मीनारायण वालावल, शुभम स्पोर्ट्स देवगड, संघर्ष कोचरा, रवळनाथ रानबांबूळी, जय शिवारा कणकवली, गरुडझेप कणकवली, याक्षणी माणगाव, जय भवानी नेरूळ, गांधयाळे, विजय प्रतिष्ठान सावंतवाडी, दिर्बादेवी पाटकरवाडी देवगड, दिप वॉरियर्स सावंतवाडी, जय गणेश पिंगुळी, कलेश्वर नेरूळ मंडळांचे प्रतिनिधी, आयोजक, कबड्डी प्रेमी, खेळाडू आदी उपस्थित होते. यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला.