पर्यावरण पुरक पध्दतीने शालेय शिक्षण मंत्र्यांचा लाडक्या गणरायाला निरोप.

2

सावंतवाडी,ता.२४: पर्यावरण पुरक पध्दतीने शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थांनी पुजलेल्या गणेशाचे पाचव्या दिवशी विसर्जन केले. यावेळी राज्यातील जनतेला सुखी ठेव, असे मागणे यावेळी त्यांनी श्रींच्या चरणी घातले. यासाठी खास घराच्या परिसरात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या मोठ्या भावाच्या सुचनेनुसार आपण दरवर्षी पर्यावरण पुरक गणपती बसवतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.पल्लवी केसरकर, शितल केसरकर, गणेश भोगटे, अमित केसरकर, अशोक केसरकर, युगा केसरकर आदी उपस्थित होते.

4