“टॅलेंट सर्च “परिक्षेतील विध्यार्थाना त्रिवेंद्रम येथील वैज्ञानिक सहलीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून शुभेच्छा…

192
2

सिंधुदुर्गनगरी ता.१९:* डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परिक्षेत जिल्यातील आठ तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या २४ विध्यार्थाची त्रिवेंद्रम  येथील वैज्ञानिक सहलीसाठी निवड करण्यात आली या विध्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या  ओरोस येथील प्रधान कार्यालयास भेट दिली . जिल्हा बँकेच्यावतीने या विध्यार्थ्यांना ब्लेझर ,पॅन्ट व शुज  भेट देण्यात आली .जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी या विध्यार्थ्यांना  सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ,जि .प. अध्यक्षा सौ. संजना  सावंत ,जि .प.उपाध्यक्ष  रणजित देसाई ,आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी , समाजकल्याण  सभापती अंकुश जाधव,माजी जि .प.अध्यक्षा सरोज परब ,बँकेचे संचालक प्रमोद कामत ,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई ,बँक अधिकारी आनंद सावंत ,पी. डी .सामंत ,जि .प.चे पदाधिकारी ,अधिकारी ,मुलांचे पालक उपस्थित होते. २४ विध्यार्थ्यांनी   बँकेच्या  प्रधान कार्यालयास भेट दिली. त्यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

                सिंधुदुर्ग जि .प . आयोजित    डॉ . ए.पी.जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परिक्षेत जिल्यातील   प्रत्येक तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या २४  विध्यार्थ्यांनची दि. १९ तें २१ऑगस्ट  या कालावधीतील त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर या ठिकाणी विमानाने  जाणाऱ्या सहलीसाठी निवड करण्यात आली .सादर सहलीत सहभागी झालेल्या २४  विध्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या  ओरोस येथील प्रधान कार्यालयास भेट दिली. जिल्हा बँकेच्यावतीने या विध्यार्थ्यांना ब्लेझर ,पॅन्ट व शुज  भेट देण्यात आली .जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी या  विध्यार्थ्यांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या . त्यानंतर विद्यार्थी सहलीसाठी गोव्याच्या दिशेने रवाना झाले .

4