पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना सक्ती…

473
2

जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी…

सिंधुदुर्गनगरी ता.१९: कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाराजी आहे.मदतनिधी ऐच्छिक असताना अधिकाऱ्यांकडुन दोन ते अडीच हजार तर कर्मचा-यांकडुन दीड ते बाराशे रुपये रक्कम द्यावी,असे आदेश खुद्द पोलीस अधीक्षक काढल्याची चर्चा आहे.
त्यामुळे एकीकडे पोलीस कुटुंब सुद्धा पूरात बाधीत झालेली असताना आमच्यावर सक्ती का? असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून विचारला जात आहे

4