संजना सावंत: यशस्वी होण्यासाठी जिल्हावासियांनी सहभाग दर्शवावा
सिंधुदुर्गनगरी ता.१९: जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहिला आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रिय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ ची घोषणा करण्यात आली.असुन जिल्हावासियांचा सहभाग घेण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन सर्वेक्षण सुरु आहे.जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन आपले मत नोँदवुन जिल्ह्याला स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये पुन्हा एकदा अग्रेसर ठेवावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता (जलशक्ती) मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 दिनांक 14 ऑगस्ट ते दिनांक 15 सप्टेंबर 2019 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सेवा पातळीवरील प्रगती, सार्वजनिक ठिकाणाचे थेट निरिक्षण, नागरिकांची प्रतिक्रिया या 3 घटकांवर हे सर्व्हेक्षण होणार आहे.
सेवा पातळीवरील प्रगती करीता 35 टक्के गुण देण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हयांनी नोंदविलेली online माहितीकरीता 10 ट्क्के गुण, सार्वजनिक शौचालयांचे SC/ST वस्तीत झालेले बांधकाम 10 ट्क्के गुण, बेसलाईन मधून सुटलेल्या लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम स्थिति या करीता 15 ट्क्के गुण निश्चित करण्यात आले आहेत.
तर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत थेट निरीक्षण करीता 30 ट्क्के गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची उपलब्धी 5 ट्क्के गुण, सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयाचा वापर 5 टक्के गुण, सर्व सार्वजनिक ठिकाणी पाणी साठा उपलब्धता 10 टक्के गुण, प्लॅस्टिक कचर्याची स्थिति 10 टक्के गुण.
नागरिकांच्या प्रतिक्रिया या करीता 35 टक्के गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये गावातील महत्वाच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया 10 टक्के गुण , ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया 20 टक्के गुण, ग्रामस्थांच्या online प्रतिक्रिया 5 टक्के गुण निश्चित करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारचे अधिकारी ग्रामपंचायतस्तरावर या कार्यक्रमातर्गत सर्व्हेक्षणाकरीता येणार असुन या सर्व्हेक्षणात जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपचांयत कार्यालय, अंगणवाडी, आठवडा बाजार ठिकाण, धार्मिक स्थळे आदीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. व्यक्तीगत मुलाखत, सामुहिक चर्चा करुन प्रतिक्रिया घेणार आहेत.
नागरिकांनी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविण्याकरीता गुगल प्लेस्टोअर मधुन SSG 2019 हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. ज्या ग्रामस्थाकडे android based स्मार्ट फोन नसेल असे ग्रामस्थ आपला प्रतिसाद 18005720112 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवु शकतात. स्वच्छतेबाबत विचारलेल्या प्रश्नाची योग्यती उत्तरे निवडुन प्रतिक्रिया नोंदविण्याच्या प्रक्रियेचे गुणांकण करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणात उत्कृष्ठ ठरलेल्या जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व जिल्हावासियांनी SSG 2019 या ॲपमाध्यमातुन मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मा. श्रीम. संजना सावंत यांनी केले आहे.