वेंगुर्ले नगरपरिषदेला निधी देताना पालकमंत्री जाणूनबुजून डावलतात…

240
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा दीपक केसरकरांवर आरोप…

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेमध्ये चांगले काम करुन राज्यातच नव्हे तर देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे.मात्र तरीही डिपीडीसीचा निधी असो वा अन्य निधी आमचे परिपुर्ण प्रस्ताव असतानाही निधी देण्यास पालकमंत्री दिपक केसरकर निधी देण्यास टाळाटाळ करुन जाणूनबुजुन डावलतात असा आरोप करीत नगरसेवकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.तसेच यापुढे पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीस उपस्थित न राहाण्याचा निर्णयही घेण्यात आला.
वेंगुर्ले न. प. ची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, सुमन निकम, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, संदेश निकम, दादा सोकटे, साक्षी पेडणेकर, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ले न. प. ला निधी देताना नेहमी आकडता हात घेतला जातो. आम्हाला आज पर्यंत डिपीडीसी, नगरो’थान मधुन ५ ते ६ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते मात्र त्यापैकी केवळ १ कोटी ८० लाख देण्यात आले आहेत हा दुजाभाव नाही का. दलितवस्तीचा अडीज कोटी निधी शिल्लक असताना आणि आमचा दाडाचे टेंब येथील स्मशानभूमी कामाचा ७० लाख रुपयांचा परिपुर्ण प्रस्ताव असताना त्या कामाला फक्त ५० लाख दिल्याने त्या कामाचे टेंडर झालेले नाही परिणामी ते काम अद्यापही करता आले नाही. वेंगुर्ले न. प. तर्फे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कामांचा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे केव्हाच देण्यात आला आहे. मात्र त्याची काहिच कार्यवाहि झालेली नाहि. जिल्हयातील इतर नगरपालिकांना मात्र पालकमंत्र्यांकडून भरघोस निधी दिला जात आहे. मात्र त्यांच्या मतदार संघातील हि वेंगुर्ले न. प. असताना आमच्यावर जाणून बुजून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप यावेळी शितल आंगचेकर, नागेश गावडे, विधाता सावंत व इतर नगरसेवकांनी केला. पालकमंत्री येथे आढावा बैठका घेतात. मात्र या आढावा बैठकांमध्ये मांडण्यात आलेली कामे होत नसल्याने व आम्हाला योग्य प्रमाणात निधी देत नसल्याने आपण यापुढे त्यांच्या आढावा बैठकांना येणार नसल्याचे शितल आंगचेकर यांनी सांगताच अन्य नगरसेवकांनीही त्याची रि ओढत अनेकांनी उपस्थित न राहाण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेना नगरसेवक संदेश निकम यांनी साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कामांचा प्रस्ताव आपल्याकडे पुन्हा देण्यात यावा, आपण तो पालकमंत्र्यांकडून मंजुर करुन आणतो. असे सांगितले.
*वेंगुर्ले शहरात ‘नॅचरल गॅस’ लाईन टाकण्यास परवानगी*
आजच्या या सर्वसाधारण सभेत वेंगुर्ले शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांना शहरात गॅस लाईन टाकण्यास परवानगी देण्याचे ठरले. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सदरची गॅस लाईन नागरीकांसाठी फायदेशीर व सुरक्षित असणार आहे. वर्षाकाठी सुमारे ८४ लाख रुपये शहरवासियांचे वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अतिवृष्टी व आपत्कालीन सेवेसाठी साधने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र यावर्षीची शहरातील पुरपरिस्थिती पहाता शहरात होत असलेल्या मोठ्या बिल्डींग या पाणी निचरा होणाऱ्या जागांवर होत नाही ना याचा विचार करावा अन्यथा कोल्हापुर-सांगली होण्यास वेळ लागणार नाही असे कृतिका कुबल यांनी सांगतिले. तर पावसाळ्यात आपत्कालीन कक्ष स्थापन करावा अशी सुचना श्रेया मयेकर यांनी मांडली. बचाव टिमने चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच वेंगुर्ले शहरातील मृत जनावरे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे खड्डे खणुन पुरुन टाकली जातात. त्यामुळे याठिकाणी दुगंधी येण्याची शक्यता असते. तसेच हि जनावरे लवकर कुजत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दहनिका खरेदी करुन मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे ठरविण्यात आले.

\