आदित्य ठाकरेची घोषणा; लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार…
सावंतवाडी ता.१९: कोकणातील नुकसानी बघितली तर मोठी आहे.अनेक गावाचा संर्पक तुटला आहे.त्यामुळे पूरग्रस्त गावासाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे सांगितले.ते बांदा येथे पत्रकारांशी बोलत होते.पूरग्रस्त भागात जाऊन पाहाणी केल्यानंतर तेथील ग्रामस्थ जी निवेदने देत आहेत.त्या निवेदनातील प्रमुख मागण्या या मुख्यमंत्र्यासमोर मांडणार असल्याचे ही त्यानी जाहीर केले.
कोल्हापूर सांगली प्रमाणे सावंतवाडी व दोडामार्ग ला पूराचा तडाखा बसला आहे ही गावे उभी राहिली पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून मदत मिळतच आहे.कारण अनेक रस्ते वाहून गेले आहेत.गावाचा संर्पक तुटला हे सर्व बघितल्यानंतर भयानक परस्थीती आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्या समवेत दोडामार्गसह सावंतवाडीला पूर ग्रस्त गावाना भेटी दिल्या