आमदार नीतेश राणे यांचे निर्देश ः कणकवली तालुका दक्षता समिती बैठक
कणकवली, ता.19 ः महापुराचा फटका कणकवली तालुक्यातीलही अनेक नागरिकांना बसला आहे. त्यामुळे रेशनकार्डवर तेल आणि तूरडाळ मिळायला हवी. त्यासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने करा असे निर्देश आमदार नीतेश राणे यांनी आज तहसीलदारांना दिले. ते तालुका दक्षता समिती बैठकीत बोलत होते.
कणकवली तालुका दक्षता समितीची बैठक तहसीलदार दालनात आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला समिती सचिव तथा तहसीलदार आऱ जे पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, सदस्य शामल म्हाडगुत, गौतम खुडकर, पंकज पेडणेकर, राकेश राणे, मिलींद मेस्त्री, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री गावडे, श्रीमती तांबे आदी उपस्थित होते कणकवली तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेऊन धान्य साठा चतुर्थीत कमी पडता नये त्या दृष्टीने मागणी करा. गॅस कनेक्शन व रॉकेलची मागणी लक्षात घेऊन दर महिन्यांपेक्षा वाढीव साठा करा असे निर्देश श्री.राणे यांनी दिले. चतुर्थीत गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी एजन्सी धारकांची संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली यावर आम. नितेश राणे यांनी याबाबतची कार्यवाही तातडीने करा अशा सूचना केल्या.
गणेश चतुर्थी हा सण कोकणातील मोठा सण आहे त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळेल, असे काम करा कणकवली तहसीलदार आऱ जे पवार यांचे गेल्या महिनाभरातील काम चांगले असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे मागणी केलेल्या नागरीकांचे रेशनकार्ड, दाखले प्रलंबीत ठेवू नका, अशा सूचना आ नितेश राणे यांनी तहसिलदारांना केल्या