सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील…

2
2
Google search engine
Google search engine

नितेश राणे; जिल्ह्यातून प्रतिदिन १ लाख लिटर दुध संकलन करण्याचा मानस…

सिंधुदुर्गनगरी,ता.३०: सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. गोपाळ सेवादाता कार्यशाळा त्याचेच एक उदाहरण आहे, असे मत भाजपाचे युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान जिल्ह्यातून प्रतिदिन १ लाख लिटर दुध संकलन करण्याचा मानस आहे. त्या दृष्टिने झाराप येथील केंद्राच्यामाध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येथील शेतकर्‍यांनी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात आज गोपाळ सेवा प्रतिनिधी कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.