वासुदेव बनून आलेल्या तरुणांना मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल…

4
2

कुडाळ,ता.३०: वासुदेव बनून आलेल्या तरुणांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुडाळ-कुंभारवाडी व पिंगुळी येथील ७ जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चव्हाण, बाळा पावसकर, यश पावसकर व अन्य चौघे अशी तक्रार झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भटक्या विमुक्त जाती समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळेयांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी तक्रार दिली होती तसेच मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस हवालदार स्वप्निल तांबे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच पिंगुळी-कुंभारवाडी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

4