कणकवली, ता.३० : कणकवली ते सुकळवाड जाणारा रिक्षा टेंपो महामार्गावरील वागदे येथे पलटी झाला. यात चालक जावेद बागवान (वय ६०) हे जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.
जावेद बागवान हे फळ विक्रीच्या वसूलीसाठी आज सकाळी सहाच्या सुमारास कणकवलीहून रिक्षा टेेंपो घेऊन निघाले होते. मुंबई गोवा महामार्गावरील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड समोर त्यांचा रिक्षा टेंपो पलटी झाला आणि रिक्षा महामार्गाच्या बाहेर जाऊन थांबली. या अपघातामध्ये जावेद बागवान हे जागीच ठार झाले. अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलिसांनी तातडीने जावेद बागवान यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच ते मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान जावेद बागवान यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच शहरातील फळ विक्रेत्यांनी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली होती.
महामार्गावर वागदे येथे रिक्षा टेंपो पलटी होऊन एक ठार…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES