कुडाळ विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मंदार शिरसाठ

2

कुडाळ : ता.१९  कुडाळ विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी शांताराम उर्फ मंदार शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. याबातचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांच्या हस्ते श्री. शिरसाट यांना देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष विजय प्रभू, उल्हास शिरसाट, जिल्हा बॅंक संचालक प्रसाद बांदेकर, जेष्ठ नेते आबा मुंज, घवनळे उपसरपंच दिनेश वारंग, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तुषार परब,गणेश लोकेगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी आदी उपस्थित होते.

16

4