निलेश राणे: कोकणातील पूरग्रस्तांसाठी ५०० कोटीची मागणी व्हायला पाहिजे…
सावंतवाडी ता.१९: जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर कुचकामी ठरले आहेत.त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत पालकमंत्री बदलायचेच हे डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काम सुरू आहे.असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा म्हणजे केवळ दिखावा आहे.ते सत्तेत आहेत,त्यांना दुधाच्या बाटल्या वाटण्याची गरज काय? पुरपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात कोकणात नुकसान झाले आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी ५०० कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी झाली पाहिजे,असेही श्री.राणे म्हणाले.
श्री निलेश राणे यांच्यासह नितेश राणे यांनी आज तालुकाध्यक्ष संजू परब यांना भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे बोलत होते ते म्हणाले जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री केसरकर अपयशी ठरले आहेत पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे कारण पुढे करून ते दिखावूपणा करत आहेत. एका गावात जायचे आणि तिथून थेट मुंबईला जायचे असा त्यांचा प्रवास आहे लोकांना दौऱ्याचे कारण दाखवून ते दिशाभूल करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात पालक मंत्री बदलायचा हे हा संकल्प डोळ्यावर समोर ठेवून महाराष्ट्र स्वाभिमान च्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीनही जागा महाराष्ट्र स्वाभिमान लढवणार आहे. माझ्या जागेसह अन्य जागेबाबत पक्षाचे नेते नारायण राणे घेणार आहे. त्यामुळे आपण काही जास्त बोलणार नाही. कोकणात कोट्यावधी रुपयांची नुकसान झाले आहे त्यामुळे या नुकसान भरपाईपोटी पाचशे कोटीहून अधिक मागणी झाली पाहिजे मात्र दुर्दैवाने आपल्या पालकमंत्र्यांचा आवाज सभागृहात पोहोचत नाही.उलट कोल्हापूर सांगली भागातील राजकीय नेते आपली मागणी लावून धरत आहे .त्यामुळे त्यांना न्याय मिळतो आणि आमचे लोक नुकसान भरपाई पासून वंचित आहेत अशी परिस्थिती आहे असे राणे यांनी सांगितले