कुडाळत राडा प्रकरणी ६ जणांना सशर्त जामीन…

2

१४ जणांवर गुन्हा दाखल; गाडी मागे घेण्यावरून घडलेला वाद…

कुडाळ,ता.०२: गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून कुडाळ शहरात झालेल्या हाणामारी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात १४ जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील ६ जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. या कामी दोन्ही गटाच्यावतीने अ‍ॅड. सुहास सावंत, उमा सावंत, अँड. स्वरूप पई, अविनाश परब यांनी काम पाहिले.
हा प्रकार १ ऑक्टोबरला कुडाळ छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात घडला होता. गाडी मागे पुढे घेण्याच्या कारण वाद झाला होता. याप्रकरणी नितेश पराडकर, कुलराज भगवान बांदेकर, दर्पण सादये, आनंद आचरेकर (सर्व रा. मालवण) यांच्यासह सुशील चिंदरकर, सिकंदर अब्दुल शेख आदींसह १४ जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यातील ६ जणांना अटक करण्यात आली.

4