राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर…

2

कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर ; संघटकपदी रुपेश पाटील…

सावंतवाडी,ता.०२: राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर, कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर तर संघटकपदी रुपेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली.

इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे:- कार्यवाह नंदन घोगळे, उपाध्यक्षपदी संजय राठोड, कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर, महिला आघाडी प्रमुख श्वेता प्रवीण मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली.

4