भाजप किसान मोर्चाच्या कोकण प्रमुखपदी भाई बांदकर…

2

देवगड,ता.०२: भाजपच्या किसान मोर्चाच्या कोकण विभागाची जबाबदारी देवगड येथील डॉ. गणेश उर्फ भाई रामचंद्र बांदकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे ठाणे व रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हा भाग विभाग देण्यात आला आहे.
बांदकर हे लहानपणापासुन संघ स्वयंसेवक त्यामुळे जनसंघ – जनता पार्टी – भारतीय जनता पार्टी असा राजकीय प्रवास करत आलेले व्यक्तीमत्व आहे.मागील पस्तीस वर्षे पुण्यात विविध व्यक्तीमत्वाच्या प्रचारयंत्रणेची यशस्वीपणे धुरा सांभाळून त्यांना यश संपादन केले आहे. ते यशदा पुणे येथे कार्यरत असल्यामुळे पक्षाच्या कोणत्याही पदावर नसतानाही एक संघ स्वयंसेवक या नात्याने ते कार्यरत होते. आजही ते माहिती अधिकार अधिनियम २००५ चे प्रशिक्षक आहेत व त्याचे प्रशिक्षण ते महाराष्ट्रभर नागरिक व कॉलेज तरुणांसाठी देत आहेत.

4