लाखे वस्ती रासाई मंडळाच्या अध्यक्षपदी कृष्णा लाखे…

2

सावंतवाडी,ता.०४: येथील लाखे वस्तीतील श्री रासाई नवरात्रोत्सव युवा कला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षपदी कृष्णा लाखे तर उपाध्यक्षपदी विकी लाखे यांची निवड करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कार्यकारीणीत खजिनदारपदी लखन पाटील, उपखजिनदार अंकुश लाखे, सचिव नितीन पाटील, कार्याध्यक्ष रोहित लाखे तर सदस्य गणेश खोरागड, संजय खोरागडे, सुनिल लाखे, प्रवीण लाखे, दिपक लाखे, गणेश पाटील, अनिता लाखे, सागर लाखे, मनोज लाखे आदींची निवड करण्यात आली.

4