अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी केले स्पष्ट…
मालवण, ता. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन कालच त्यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मानधन जमा न झाल्याने आंदोलन छेडले होते. यात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले असता त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ठेकेदारास केलेल्या सूचनेनुसार काल सायंकाळी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली.
काल सायंकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन जमा झाले असतानाही काही कर्मचाऱ्यांनी मानधन जमा झाले नसल्याचे सांगितले. यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन कालच जमा झाले आहे. मानधन जमा झाले नाही असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याची महिती करून घ्यावी. मानधनाबाबत कोणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.