घारपी गावाकडे शासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष….

2

ग्रामस्थांचा आरोप; पूरग्रस्त गाव जाहीर करा, तहसीलदारांकडे मागणी…

सावंतवाडी ता.२०:मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे घारपी गावात नुकसान झाले आहे.परंतु त्याठिकाणी यथोचित शासनाची कोणतीही मदत पोहोचले नाही.अशी नाराजी तेथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे व्यक्त केली.तसेच लोकांची मागणी व झालेले नुकसान लक्षात घेता गावाला पूरग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.ग्रामस्थांनी आज येथील तहसीलदार कार्यालयात श्री.म्हात्रे यांची भेट घेतली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी उपस्थित राहून त्यांना आर्थिक सहकार्य केले.
यावेळी दीपक गावडे,बाळकृष्‍ण गावडे,विजय गावकर,हरिश्‍चंद्र गावडे,संजय गावडे,लावू गावडे,सुनील गावडे,विठ्ठल गावडे,रामा गावडे,जयदेव गावडे,विनायक गावडे आदी उपस्थित होते.
याठिकाणी मोठा पाऊस होऊन तब्बल दहा ते बारा दिवस उलटून गेले.तरी अद्याप पर्यंत गावात जाणारा रस्ता सुरू झाला नाही.कोणतीही शासनाची मदत गावात पोहोचली नाही.गावातील विद्यार्थ्यांचे तसेच लोकांचे हाल होत आहेत.या सर्व गोष्टी मांडण्यासाठी आम्ही कमी पडलो.अशी खंत सुद्धा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली दरम्यान लोकांची मागणी लक्षात घेता या ठिकाणी रस्ता सुरळीत करावा,शासकीय योजना व मदत आम्हाला देण्यात यावी,तसेच एसटी वाहतूक सुरू करण्यात यावी,गावात आरोग्य दुकान अशा सुविधा मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत चतुर्थी तोंडावर आल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.त्यामुळे सर्व बाबी लक्षात घेता गाव पूरग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

10

4