रस्त्यांच्या प्रश्नावरून सावंतवाडीत बांधकामचे अधिकारी “टार्गेट”

2

तात्काळ खड्डे बुजवा,अन्यथा गप्प बसणार नाही.सर्वपक्षीयांचा इशारा….

सावंतवाडी ता .२०: मुंबई-गोवा महामार्ग तसेच आंबोली कडे जाणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्यांवरून आज सर्वपक्षीय पदाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना टार्गेट केले.एकीकडे लोकांचे जीव जात असताना अधिकारी व ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात करण्यात आला.तसेच चार दिवसात डांबर वापरून तात्काळ खड्डे बुजवा,अन्यथा तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा असा इशारा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आला.
यावेळी लोकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता,येत्या दोन दिवसात खड्डे बुजवण्या संदर्भात उपाययोजना करू असे देसाई यांनी सांगितले.सावंतवाडी शहरातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग आणि आंबोली कडे जाणारा राज्यमार्ग या दोन्ही मार्गांचे परिस्थिती अत्यंत दयनीय आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर,सुधीर आडीवरेकर,निशाांत तोरसकर,राजू बेग,महेद्र सांगेलकर,राजू कासकर,प्रसाद अरविंदेकर,बाबल्या दुभाषी,सतिश नार्वेकर,विठ्ठल गावडे,अजय सावंत,दत्ता सावंत,मिलिंद देसाई,आशिष सुभेदार,संजू शिरोडकर,सचिन कारीवडेकर, गोविंद साटेलकर,सचिन बिर्जे,संतोष सावंत,बाळा नमशी
आदी उपस्थित होते.

4