माजगावचे निवृत्त पोस्टमन रामनाथ चौगुले यांना सर्पदंश…

202
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रकृती चिंताजनक;अधिक उपचारासाठी बांबुळी रुग्णालयात हलविले…

सावंतवाडी ता.२०: माजगाव येथील निवृत्त पोस्टमन आत्माराम चौगुले (६७) यांना कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.पत्रकार चेतन चौगुले यांचे ते वडील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,घरा नजीकच्या परिसरात हा नाग वास्तव्यास होता.दरम्यान आज सकाळी जखमी श्री.चौगुले घरातील एका कोपऱ्यात ठेवलेला सायकल मध्ये हवा भरण्याचा पंप काढण्यासाठी गेले असता तेथे आश्रयासाठी असलेल्या नागाने त्यांच्या हाताच्या दोन बोटांना दंश केल.यात त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने तेथीलच ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे.
\