भुईबावडा बाजारपेठेत दत्त मंदिरातील गाभारा फोडला; तर दारुच्या दुकानालाही केले लक्ष
वैभववाडी.ता,२०:सिंधुदुर्ग जिल्ह्यात चो-यांचे सत्र सुरू असतानाच भुईबावडा बाजारपेठेत सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिरातील गाभारा फोडला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तर याच दरम्यान हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दारूच्या दुकानाला लक्ष केले. दारुच्या दुकानाचा दरवाजा तोडला. याही ठिकाणी त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
भुईबावडा बाजारपेठेत सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिरातील गाभारा फोडून आत प्रवेश केला. पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. गाभा-यातील काच फोडून चोरट्यांनी अंदाजे २ हजार रूपयांचे नुकसान केले आहे.
याच दरम्यान चोरट्यांनी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दारु दुकानावर मोर्चा वळविला. दारुच्या दुकानाचा त्यांनी दरवाजा तोडला. परंतु या ठिकाणीही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. एकाच रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातल्याने भुईबावडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.