खड्डा मुक्त रस्ता दाखवा आणि पाच हजार रुपये मिळवा…

235
2
Google search engine
Google search engine

मनसेच्या परशुराम उपरकरांचे आमदार खासदारांना आव्हान…

सावंतवाडी.ता,२०: जिल्ह्यातील रस्ते खड्ड्यात आहेत, मग पालक मंत्री दीपक केसरकर यांनी आणलेला कोट्यावधीचा निधी गेला कुठे.? असा प्रश्न मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान रस्त्याची डागडुजी केली. असे सांगणाऱ्या शिवसेना भाजपच्या मंत्र्यांनी जिल्ह्यातील खड्डा मुक्त रस्ता दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवावे अशी योजना यावे श्री उपरकर यांनी जाहीर केले. श्री तुपकरी यांनी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजू कासकर आशिष सुभेदार विठ्ठल गावडे संतोष भैरवकर आदी उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले जिल्ह्यातील सर्व रस्ते खड्ड्यात गेले आहेत. अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. ते कोट्यावधी रुपये आणले असे सांगत आहे. ते पैसे गेले कुठे असा प्रश्न उपरकर यांनी यावेळी केला. आता शासनाला आणि सत्ताधाऱ्यांना खड्ड्यात बाबत जागण्यासाठी खड्ड्यात बाबत जागण्यासाठी खड्डे नसलेला रस्ता दाखवा व पाच हजार रुपये कमवा ही बक्षीस योजना मनसेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचा लाभ आमदार व खासदारांनी घ्यावा अशी खोचक टीका यावेळी उपरकर यांनी केली.