बांद्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उद्या रक्तदान शिबिर…

2

विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात आयोजन…

बांदा ता.२०: येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक २१ रोजी येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे.
गतवर्षी १५१ दात्यांनी रक्तदान केले होते. यावर्षी ३०० हुन अधिक दात्यांचे लक्ष मंडळाने ठेवले आहे. वर्षभरात मंडळाने रक्तदाता कार्डच्या माध्यमातून कित्येक रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.सकाळी साडेआठ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात होणार आहे.

4