कृषिमंत्री डॉ.श्रीकांत बोंडे उद्या बांद्यात…

2

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी साधणार संवाद…

बांदा ता.२०: कृषिमंत्री डॉ. श्रीकांत बोंडे हे उद्या बुधवारी दुपारी साडेतीन वाजता बांदा येथे महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
येथील ग्रामपंचायत सभागृहात दुपारी साडेतीन वाजता महापुरात शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडायच्या आहेत. यावेळी समस्या व प्रश्न यांची लेखी निवेदने कृषिमंत्री बोंडे स्वीकारणार आहेत. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले पंचनामे व देण्यात येणाऱ्या भरपाईबाबत कृषिमंत्री आढावा घेणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ व सरपंच मंदार कल्याणकर यांनी केले आहे.

4