सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची स्थापना…

258
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकर; कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न…

सावंतवाडी ता.२०: जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना येथे चित्रित होणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आल्याची घोषणा माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज येथे केली.दरम्यान मनविसेनेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित कलाकारांनी या संघटनेत प्रवेश केला.
कोकणातील निसर्गसौंदर्य पाहता सध्या मोठ्या प्रमाणात हिंदी व मराठी चित्रपटांचे शूटिंग आपल्या जिल्ह्यात होत आहे.मात्र येथील स्थानिक कलाकारांना डावलून अथवा त्यांना कमी मानधन देऊन त्यांच्या कडून कामे करुन घेतली जात आहेत.हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे.या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या संघटनेची स्थापना करत असल्याचेही श्री.उपरकर म्हणाले.
ही संघटना श्री.सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह कोकणात वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या संघटनेच्या माध्यमातून येथील स्थानिक कलाकारांना चित्रपटात काम करण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्र देण्यात येणार आहेत.तसेच कोणत्याही कलाकारावर अन्याय होत असल्यास त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत राहणार आहे.असे यावेळी बोलताना श्री सुभेदार यांनी सांगितले.दरम्यान या संघटनेत नाव नोंदणी करून जिल्ह्यातील कलाकारांनी एकत्र यावे व आपल्या हक्कासाठी लढावे असे आवाहनही श्री.सुभेदार यांनी केले.
यावेळी मनसेचे पदाधिकारी राजू कासकर,अतुल केसरकर,संतोष भैरवकर,विठ्ठल गावडे,संतोष सावंत,संकेत मयेकर,संकेत शेटकर तसेच अविनाश म्हापणकर,रामचंद्र गावडे,अनिकेत सोन्सुरकर, प्रतीक गावडे,गौरव कदम आदींसह मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते.

\