सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

135
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२०: येथील मराठा समाजाच्या वतीने दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रविवार दि.२५ आॅगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता गुणगाैरव साेहळा आयाेजित करण्यात आला आहे.हा सत्कार सोहळा येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात संपन्न होणार आहे.
यावेळी दहावी 80 टक्के व बारावी 75 टक्केच्या वर तसेच विशेष प्राविण्य घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे
यावेळी दहावी मध्ये ८० टक्के च्या वर व बारावीत ७५ टक्केच्या वर गुण प्राप्त केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केली आहे व ज्यांनी अद्याप पर्यंत नाव नोंदणी केली नाही,अशा सर्व मुलांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून नाव नोंदणी करावी.आणि जास्तीत-जास्त मराठा समाजाच्या मुलांनी या समारंभात सहभागी व्हावे,असे आवाहन सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे,उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक,सचिव आकाश मिशाळ यांनी केले आहे.