दोडामार्गात शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय अभंग गायन स्पर्धा…

122
2

दोडामार्ग/सुमित दळवी ता. २०: कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संचलित नूतन विद्यालय कळणे व प्राचार्य एम.डी.देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दोडामार्ग तालुकास्तरीय अभंग स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष प्राचार्य एम.डी.देसाई,केर गावचे माजी सरपंच तथा काँग्रेस नेते प्रेमानंद देसाई,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गुळळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अभंग स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटात नूतन विद्यालय कळले येथे होणार आहे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अभंग स्पर्धेला सुरुवात होणार आहे तालुक्यातील इच्छुक शाळेतील स्पर्धकाने पंधरा मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धेचे उद्घाटन मा. प्रेमानंद देसाई मा. लक्ष्मण गुळळेकर यांच्या हस्ते होणार असून इतर संस्था अध्यक्ष प्राचार्य एम डी देसाई यांच्या हस्ते होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील तसेच कळणे पंचक्रोशीतील पालक माजी विद्यार्थी अभंग प्रेमी ने या स्पर्धेला उपस्थित रहावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शिक्षक श्री गोसावी ९४२१४१९०११ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

4