डॉ.फैझान खान; घरगुती वापरातील वस्तूंसह आयुर्वेदिक औषधांवर विशेष सूट…
सावंतवाडी ता.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इस्टोर इंडियाचे तिसरे नवे दालन येथील वैश्यवाडा परिसरात सुरू करण्यात आले आहे.या शाखेच्या माध्यमातून येथील ग्राहकांना घरगुती वापरातील वस्तूंसह आयुर्वेदिक औषधांवर विशेष सूट देण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ.फैझान खान यांनी आज येथे आयोजित शाखेच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी दिली.या शाखेचा उद्घाटन डॉ.खान यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
डॉ .खान पुढे म्हणाले,या दालनात उपलब्ध घरगुती वापरातील किराणा सामान,आयुर्वेदिक औषधे,सुकामेवा,शीत पेये तसेच इतर जीवनावश्यक वस्तूवर ४ टक्के पर्यंतचे भरघोस सूट देण्यात आली आहे,तरी सावंतवाडीकरांनी या दालनाला भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले..
यावेळी अनिल जाधव,संजना परांजपे,शैलेंद्र पेडणेकर,रवींद्र मंडळ,स्वप्निल गावडे,रविना पटेल,गणेश नाईक,राजन पातळे आदी मान्यवर उपस्थित होते.