वेंगुर्ले – आडेली गावातील ग्रामस्थांचा भाजपा मध्ये प्रवेश

2

वेंगुर्ले,ता,२०: पंधप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी जे सर्वसामान्य जनतेसाठी निर्णय घेतले त्यावर प्रभावित होऊन आडेली गावातील गावठणवाडी, फौजदारवाडी आणि देवुळवाडी येथील ग्रामस्थांनी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.

या प्रवेशावेळी तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर, जेष्ठ कार्यकर्ते आपा ठाकुर व अनंत नेरुरकर, बुथप्रमुख पांडुरंग बांदेकर मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी मंगेश धर्णे, मनोज धर्णे, स्वप्निल धर्णे, परेश हळणकर, अक्षय धर्णे, सखाराम धुरी, दयानंद धर्णे, बाळकृष्ण धर्णे, राकेश धर्णे, विजय पुनाळेकर, लवु धर्णे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी सर्वांचे सदस्य नोंदणी फाॅर्म भरुन घेतले व भाजपा चे प्राथमीक सदस्य बनऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

19

4