जिल्हा बँकेची उद्या ३६ वी सर्वसाधारण सभा

2

सिंधुदुर्गनगरी ता.२०:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषि भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. वार्षिक सभेनंतर त्याच ठिकाणी जिल्हा बँकेने जाहिर केलेल्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
याबाबत अध्यक्ष सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात, वैधानिक लेखा परिक्षण व नाबार्ड यांचेकडून सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त करणारी आपली जिल्हा बँक राज्यात अग्रणी राहिलेली आहे. बँकेच्या जिल्ह्यात 98 शाखा असून सभासद संस्था, ठेवीदार, ग्राहक व शेतकरी यांच्या विश्वासाला ही बँक पात्र ठरलेली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने बँकेच्या ठेवी, कर्ज, वसूली, नफा, वृद्धि, सीआरएआर यामध्ये भरीव वाढ करतानाच चौफेर प्रगती साधली आहे. बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला असून जिल्ह्यातील एकूण बँकांच्या प्रमाणात जिल्हा बँकेच्या शाखांचे प्रमाण 39 टक्के आहे. बँकेच्या 1904 कोटींवर ठेवी असून स्वनिधी 173 कोटींपेक्षा जास्त आहेत. बँकेचा सी.डी.रेशो 64.69 टक्के एवढा आहे. 2019 या आर्थिक वर्षात उत्पन्न 217 कोटी पेक्षा जास्त आहे. बँकेचा ढोबळ नफा 40 कोटी तर नव्वळ नफा 12 कोटी आहे. निव्वळ एन पी ए चे प्रमाण शून्य टक्के आहे. भांडवल पर्याप्तता प्रमाण 11.56 टक्के आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
37 शाखांत एटीएम व मोबाईल एटीएम व्हॅन मिळून 38 एटीएम आहेत. मॅग्नेटिक स्ट्रिप एटीएम कार्डच्या जागी इएमव्ही चिप आणि पिन बेस रुपे एटीएम कार्ड ग्राहकांना देण्यात आली आहेत. ग्राहकांना इंस्टा कार्ड वितरित करण्यात आली आहेत. 55 हजार 884 कार्ड वितरित करण्यात आली आहेत. रिक्षा व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांना गुंतवणूक न करता ग्राहकांकडून क्यूआर कोड सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पॉस मशीनचे वितरण करण्यात आली आहे. टॅब बँकिंगद्वारे डोअर स्टेप बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ई-मेल स्टेटमेंट सुविधा सुरु करण्यात आली आहे, असे प्रसिद्धि पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

2

4