Tuesday, March 18, 2025
Google search engine
HomeUncategorizedमनसैनिक 22 ऑगस्टला सिंधुदुर्गात शासनाचा निषेध नोंदविणार

मनसैनिक 22 ऑगस्टला सिंधुदुर्गात शासनाचा निषेध नोंदविणार

परशुराम उपरकर यांची माहिती ः ईडीच्या चौकशीला राज ठाकरे व मनसैनिक भीक घालणार नाहीत

कणकवली, ता.20 ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची नोटीस पाठविल्याने राज्यात मनसैनिक शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीत असताना निव्वळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे व आदेशाने मनसैनिकानी शांततेने निषेध नोंदविण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणुन सिंधुदुर्गात मनसैनिक कुडाळ येथील हॉटेल आरएसएन येथे शासनाच्या निषेधार्थ निषेध सभा 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता घेणार असुन शासनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील सर्व विरोधी पक्षानी या सभेत सहभाग घेऊन शासनाचा निषेध नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यानी केले आहे.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आम.परशुराम बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मनसे वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री.तावडे,कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष सावंत यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीचा वचपा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान व गृहमंत्री म्हणजेच मोदी – शहा जोडी कशी फसवीे व जनतेची दिशाभुल करणारी आहे हे दाखवुन दिले होते. जनतेला दिलेला शब्द पाळला जात नाही आणि भ्रष्टाचार कशाप्रकारे वाढला आहे हे लोकांसमोर व्हिडीओच्या माध्यमातुन आणले होते. जनतेच्या मनात तीव्र संताप असतानाही ईव्हीएम मशिनच्या माध्यमातुन केंद्रात भाजपाचे सरकार आले व ईव्हीएम मशिनबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी पुढारपण घेऊन सर्व नेत्यांना एकत्र करत ईव्हीएम मशिनबाबत सरकार कशाप्रकारे आवाज दाबत आहे हे जनतेला पटवुन सांगितल्याने राज ठाकरे याना ईडीची नोटीस पाठवुन धमकावण्याचे प्रकार सरकार करत आहे. मात्र ईडीच्या नोटीसीला आपण भिक घालत नाही असे राज ठाकरे यानी यापुर्वीच स्पष्ट केले असल्याने मनसे कार्यकर्ते घाबरलेले नसुन हे मनसैनिक ईडीच्या नोटीसीला किंमतही देत नाहीत असे परशुराम उपरकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीची धास्ती
लोकसभेप्रमाणे राज्याच्या निवडणुकीत घोटाळे बाहेर काढुन जनतेला मंत्र्यांचे व सरकारचे खरे रुप राज ठाकरे हे दाखवुन देतील याची भिती आणि धास्ती घेऊन सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीची नोटीस देवुन मनसेला घाबरविण्याचा प्रयत्न करत असलेतरी मनसैनिक मात्र नव्या जोमाने जागा झाला असुन केवळ राज ठाकरे यानी आवाहन केल्याने मनसैनिक शांत असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले. आज राज ठाकरे याना नोटीस बजावली. उद्या अन्य कोणत्या नेत्याला ईडीची भिती दाखविली जाईल अशा प्रकारे ईडीची धमकी देऊन घाबरविण्याचा प्रयत्न करणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचा टोला उपरकर यानी लगावला.
जनतेने आता सरकार विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे म्हणुनच जिल्ह्यातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन 22 ऑगस्ट रोजी निषेध सभेत सहभागी होण्याचे आवाहन मनसेतर्फे करण्यात येत असल्याचे यावेळी माजी आम.परशुराम उपरकर यानी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments