मातोंड गावचे माजी सरपंच उमेश परब यांचे उपचारादरम्यान निधन

181
2

ट्रॅक्टर मध्ये पाय जाऊन झाला होता अपघात

वेंगुर्ले : ता.२०
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे माजी सरपंच उमेश अमृत परब (४३) यांचे गोवा- बांबुळी येथे उपचारादरम्यान सोमवारी (१९ ऑगस्ट) दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वतःची शेती करत असताना ट्रॅक्टर मध्ये त्यांचा पाय जाऊन अपघात झाला होता. त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते.मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज मातोंड वरचे बांबर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मातोंड गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी मातोंड गावातच नव्हे तर पंचक्रीशीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मातोंड ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सलग १० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. त्यांच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, भाऊ, बहिणी, भावजया, पुतणे असा परिवार आहे. वेंगुर्ला शाळा नं ४ चे शिक्षक तथा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष, जिल्हा शिक्षक पतपेढी माजी उपाध्यक्ष संतोष परब यांचे ते बंधू होत.

4