असनियेतील ग्रामस्थ अखेर स्वतःच्या घरात परतले 26 कुंटूबांचा समावेश:पूरपरिस्थितीत केले होते स्थलांतर

151
2

ओटवणे ता.२०: दरडींमुळे असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर केलेले कणेवाडी ग्रामस्थ अखेर मंगळवारी हक्काच्या घरात परतले.मंगळवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे व शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी स्थलांतरीत ग्रामस्थांची भेट घेतली.यावेळी झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी तहसीलदारांना पत्र देऊन घरी परतण्याचा निर्णय घेतला.बुधवारी तहसीलदारांना सदरचे पत्र दिले जाणार आहे.
असनिये घारपी मार्गावर दरड कोसळल्यानंतर कणेवाडी येथील २७ कुटुंबियाना असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले होते.स्थलांतर केल्यावर 12 दिवस लोटले,मात्र भूगर्भ तज्ज्ञांचा अहवाल आज येणार,उद्या येणार असे सांगून ग्रामस्थांना घरी पाठविण्याचा निर्णय लांबविला जात होता.कणेवाडी येथील घरांना कोणताही धोका नाही,केवळ अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे.केवळ खबरदारी म्हणून शासनाच्या निर्देशानुसार ग्रामस्थ स्थलांतर झाले.स्थलांतरीत करण्यात आलेल्या ग्रामस्थांना प्राथमिक शाळेत कोणत्याही असुविधा नाहीत,मात्र आम्हाला सोई सुविधा नको,आम्हाला घरी जायचे आहे,अशी भावनिक मागणी ग्रामस्थ केली होती.ग्रामस्थांची नाराजी पाहता,मंगळवारी सावंतवाडीचे तहसीलदार राजराम म्हात्रे,शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती अशोक दळवी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी आम्हाला घरी जायचे आहे,ही एकच मागणी लोकांनी केली.भूगर्भ तज्ज्ञांचा अहवाल अजूनही आपणास प्राप्त झाला नाही, मात्र लोकांच्या भावना लक्षात घेता,
स्थलांतरीत ग्रामस्थांनी स्वतःच्या जबाबदारीवर तसेच पुन्हा अतिवृष्टी सारखा प्रसंग ओढवल्यास स्थलांतरीत होण्याच्या अटीवर, तसे पत्र देऊन घरी जाण्याची परवानगी श्री म्हात्रे यांनी दिली.त्यानंतर स्थलांतर केलेले कणेवाडी ग्रामस्थ अखेर मंगळवारी हक्काच्या घरात परतले.

4