मुक्या प्राण्याची माणूसकी: साप चावलेल्या चौगुलेंची तब्येत स्थिर
सावंतवाडी/ अमोल टेंबकर
कुत्रा मांजरासारख्या मुक्या प्राण्यांनी माणसाला लावलेला लळा आपण अनेकदा अनुभवला असेल.परंतु विषारी नागाने आपल्या सोबत मैत्री केली आणि त्यानेच घरातील व्यक्तीचा चावा घेतला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय माजगाव येथील चौगुले कुटुंबाला आला.
या सर्व परिस्थितीत आपल्या पतीला विषारी नाग चावलेला असतानासुद्धा,त्येंका कायच होवचा नाय.”तो माझो पोर आसा माझ्या हातार तो खेळता,मी तेका दुध दितय.असो काय तो असा निर्विकार प्रश्न त्या मातेने उपस्थित केला होता.तीच्या या प्रश्नानंतर उपस्थित शेजा-यांसह डाॅक्टरनी सुध्दा आश्चर्य व्यक्त केले होते.मात्र अखेर त्या माऊलीचा विश्वास खरा ठरला आणि त्यांच्या पतीला पुनर्जन्म मिळाला.
झालेली घटना अशी की माजगाव येथील निवृत्त पोस्टमन रामनाथ चौगुले यांना नागाने दंश केला. अशा परिस्थितीत तब्बल एक तास ते घरातच राहिले. मात्र काही वेळाने त्यांना शेजारी प्रशांत मोरजकर,अवी पडते,सचिन मोरजकर,बाळू पडते यांच्या मदतीने येथील कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी असलेले डॉक्टर अभिजीत चितारी आदींनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली परंतु त्यांची नाडी मंदावली. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे चौगुले यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्याचा सल्ला डाॅक्टरांनी नातेवाईकांना दिला.त्यानुसार चौगुले यांना बांबुळी येथे हलवण्यात आले. मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केली व विषारी साप चावलेला असून सुद्धा त्यांची प्रकृती स्थिर आहे .या सर्व परिस्थितीत विषारी नाग चावलेला असताना सुद्धा त्यांच्या पत्नीने दाखवलेला विश्वास अंगावर काटा आणणारा होता. माझ्या पतीला काही होणार नाही असा विश्वास तिने व्यक्त केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या शेजाऱ्यांसह असलेल्या डॉक्टर ने सुद्धा त्यांच्या या सांगण्याचे आश्चर्य व्यक्त केले. मात्र सायंकाळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या सर्व परिस्थितीत पुन्हा एकदा मुक्या प्राण्यावरचे प्रेम अधोरेखित झाले. या सर्व प्रकारात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असावेत मात्र विषारी सापाने दंश करून सुद्धा चौगुलेंची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून परमेश्वराचे आभार मानण्यात आले आहे.