एम.के.गावडे यांनी दशावतार लोककला अकादमीची स्थापना करावी

170
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सतिश पाटणकर : वेंगुर्लेत दशावतार कार्यशाळा संपन्न

वेंगुर्ले.ता,२०: दशावतार हि मराठी नाट्य भूमीची नाट्य गंगोत्री आहे. भगवदगीतेत या कलेचा उल्लेख आढळतो. दशावतार लोककलेसाठी १९९७ पासून एम.के.गावडे प्रबोधिनी सातत्याने चांगले प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोककला अकादमीची स्थापना करावी. सर्वांनी एकत्र येत ही संघटना मजबूत करून शासनाचे दरवाजे ठोठावावेत,असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी व लेखक सतिश पाटणकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
एम.के.गावडे प्रबोधिनी मार्फत वेंगुर्ले साई मंगल कार्यालय येथे दशावतार लोककला कार्यशाळा लेखक सतिश पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री.पाटणकर बोलत होते.गणेशास पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष एम.के.गावडे, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, उपाध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे, सुधीर कलिंगण, डॉ.संजीव लिंगवत, दत्तप्रसाद शेणई, रामसिंग राणे, यशवंत तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रबोधिनीचे अध्यक्ष एम.के.गावडे म्हणाले कि गणपती हा कलेचा अधिपती आहे. दशावतार कलाकार या कलेतून गणपतीची,ग्रामदेवतीची सेवा करतो,हे उल्लेखनिय आहे. दशावतार लोककलेला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ,मानधन वाढ, जास्तीत जास्त निधी या लोककलेसाठी आणावयाचा असेल तर सर्वांनी एकत्रित व्हा. व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मंडळे तयार करा. या लोककला वाढीसाठी आपले विशेष प्रयत्न व सदैव सहकार्य राहील,असे ते म्हणाले. यावेळी नितीन कुबल, सरोज परब, दीपिका राणे, आनंद मोचेमाडकर, रोहन वराडकर आदींसह बहुसंख्येने दशावतारी कलावंत उपस्थित होते. यावेळीं प्रमुख अतिथी सतिश पाटणकर यांच्या हस्ते जयसिंग राणे, गौरव पार्सेकर, सुधाकर दळवी, सुधिर कलिंगण, बाबा मेस्त्री, बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे, दत्तप्रसाद शेणई, सुरेश गावडे व अन्य दशावतारी, ज्येष्ठ कलावंत आणि वैभव खानोलकर यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळीं दशावतारी कलावंतांच्या वतीने एम.के.गावडे यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर, प्रास्तविक व स्वागत योगेश कुबल तर आभार प्रज्ञा परब यांनी मानले.

\