मायकल डीसोझा:लवकरच काम सुरू करण्यासाठी प्रयत्न…
सावंतवाडी.ता,२१:कोलगाव काजरकोंड पुलासह कारीवडे येथील कट्टा पुलाच्या नुतनीकरणासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी पूर निधीतून तरतूद करण्यात आली आहे. लवकरच काम सुरू केले जाईल. असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी व्यक्त केला.
नुकत्याच ओढवलेल्या पुरपरिस्थितित कोलगाव आंबेगाव- सावंतवाडी जोडणारे तसेच कारीवडे येथील कट्टा पूल पाण्यात खचले होते,तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने ते धोकादायक बनले होते.
ही परिस्थिती लक्षात घेता पुलाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला. निधी मंजूर करण्यात यावा. अशी मागणी घेऊन श्री डिसोजा मुंबई येथे गेले होते. काल मुंबईत झालेल्या बैठकीत या पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यात काजरकोंड जिल्हा परिषदेच्यावतीने तर कारीवडे येथील पूल बांधकाम विभागाच्या वतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालक मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.यावेळी शिवदत्त घोगळे उपस्थित होते.