बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांचा तडकाफडकी राजीनामा…

2

सावंतवाडी ता.२१: बांदा भाजपचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी आपल्या सरपंच पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे.आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.याबाबत अधिकृत माहीतीसाठी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला आहे.
श्री.कल्याणकर हे स्वच्छ चारित्र्याचे व मनमिळावू सरपंच म्हणून ओळखले जातात बांद्यासारख्या भाजपाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती त्यांनी यापूर्वीसुद्धा सरपंच म्हणून काम केले होते.मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी असल्यामुळे अखेरच्या वेळी घडलेल्या नाट्यात ते सरपंच म्हणून बसले होते.मात्र अचानक त्यांनी हा निर्णय घेतला आहे.याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

24

4