वेंगुर्ले नारायण तलाव प्रकरण : वस्तुनिष्ठ अहवालासाठी २८ ला तलावाची पाहणी

2

वेंगुर्ले.ता,२१: नारायण तलाव दुर्घटना व भ्रष्टाचारासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता व तक्रारदार अतुल हुले यांनी नारायण तलावाची प्रत्यक्ष पहाणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल १९ सप्टेंबरच्या सुनावणीवेळी सादर करावा असे निर्देश उप लोकायुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार श्री. हुले व जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता हे २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नारायण तलावाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती अतुल हुले यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी ज्या नागरीकांना वस्तुनिष्ठ माहिती सादर करावयाची आहे त्यांनी यावेळी उपस्थित रहावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

नारायण तलाव दुर्घटना व भ्रष्टाचारा संदर्भात उपलोकायुक्त यांच्याकडे १६ जुलै रोजी सुनावणी झाली असता जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी वस्तुस्थितीशी विसंगत माहिती दिल्याने अतुल हुले यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर झालेल्या सविस्तर चर्चेअंती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता व तक्रारदार अतुल हुले यांनी नारायण तलावाची प्रत्यक्ष पहाणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल १९ सप्टेंबरच्या सुनावणीवेळी सादर करावा असे निर्देश उपलोकायुक्तांनी दिले. त्यानुसार बुधवार २८ ऑगस्ट रोजी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता व तक्रारदार अतुल हुले हे सकाळी ११ वाजता नारायण तलावाची पाहणी करणार आहेत. दरम्यान, या प्रकरणी ज्या नागरीकांना वस्तुनिष्ठ माहिती सादर करावयाची आहे त्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. हुले यांनी केले आहे.

 

16

4