सावंतवाडीत जनशताब्दी थांबणार,हे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाचे यश

273
2

बबन साळगावकर:कोणी नाहक क्रेडिट घेत असेल तर चुकीचे…

सावंतवाडी ता.२१: जनशताब्दीसह अन्य गाड्यांना मिळालेला थांबा,हा कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि डि.के.सावंत यांच्या आंदोलनाचे यश आहे.त्यांच्या आंदोलनानंतर सुशेगात असलेल्या राजकारण्यांना जाग आली.असा टोला सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे लगावला.जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा मिळाल्यानंतर श्री.साळगावकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,गेले अनेक दिवस सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनला लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती.परंतु या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नव्हते.परंतु कोकण प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डि.के.सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले,आणि त्यानंतर सगळ्यांना या आंदोलनाची जाग आली.त्याठिकाणी सर्व पक्षीय नेते धावले आणि आज ते “क्रेडिट” घेण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु केवळ कोकण प्रवासी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे या ठिकाणी गाड्या थांबण्यास मदत झाली आहे.रेंगाळलेले मळगाव रेल्वे टर्मिनसचे काम तसेच अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यासाठी तेथील लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आह. मात्र दुर्देवाने त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही,ही शोकांतिका आहे.

4