किल्ल्याच्या प्रतिकृतीचे पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

2

ओरोस येथील पोलिस कवायत मैदानावर केली आहे उभारणी…

सिंधुदुर्गनगरी ता.२१: पोलीस कवायत मैदानावर उभारलेल्या नुतन किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन बुधवारी गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस कवायत मैदानावर किल्ला उभारणीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते बुधवारी सकाळी 11 वाजता या नूतन किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, रविराज फडणीस, पोलीस निरीक्षक संजय कातीवले, यांच्यासह जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटन केल्या नंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, किल्ल्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी करण्याचा प्रयत्न होता. परंतू त्यावेळी जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, पूर्वी किल्ल्याचे चांगल्या प्रकारे संरक्षण केले जायचे. म्हणून सिंधुदुर्गनगरीत किल्ला उभारला आहे. जेणेकरून हा किल्ला पाहून पोलीस दलाला जाणीव निर्माण होईल.

18

4