भाजप की महाराष्ट्र स्वाभिमान,दहा दिवसात निर्णय…

2

नारायण राणे: अमित शहांचा भाजपा प्रवेशाला ग्रीन सिग्नल…

मुंबई.ता,२१:
भाजपा की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष याबाबत येत्या दहा दिवसात निर्णय घेणार आहे. माझ्या भाजपा प्रवेशाला भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची प्रतीक्षा आहे. अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे स्पष्ट केली. त्यांनी आपल्या पुढच्या राजकीय भूमिकेबाबत एका चॅनलला मुलाखत दिली.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात. याची प्रतीक्षा आहे,मी भाजपमध्ये राहणार की माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. येत्या चार-पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत निर्णय कळवणार आहेत. त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं राणेंनी सांगितलं.

4

4