पोलिसांवरील हल्ला, सोडुन मराठा आंदोलकांवरील अन्य गुन्हे मागे…. दिपक केसरकर:विविध गुन्हयातील ३० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना सुपुर्द…

2

सिंधुदुर्गनगरी 
पोलीसांवर झालेल्या हल्ल्यातील खटला तसाच ठेवून मराठा आंदोलकांवरील उर्वरित दहा खटले मागे घेतले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिपक केसरकर यांनी बुधवारी पोलीसांच्या कार्यक्रमात दिली. तसेच विविध गुन्ह्यात चोरीला गेलेला 30 लाखाचा मुद्देमाल फिर्यादींना सुपुर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात फिर्यादींना मुद्देमाल सुपुर्द करण्याचा कार्यक्रम बुधवारी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यातील पोलीस निरीक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
26 जुलै 2018 रोजी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलीसांवर हल्ला देखील झाला होता. यावेळी संशीयीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ब-याच जणांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभुमीवर बोलताना पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेल्या अकरा खटल्यापैकी दहा खटले मागे घेण्यात आले आहेत. तर पोलीसांवरील हल्ल्याचा खटला तसाच ठेवण्यात आला आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले.
पोलीस विभागावर बोलताना नाम केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्यात आपला पोलीस विभाग राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. जिल्हा सीसीटीव्ही कॅमेर्‍याखाली आणण्यासाठी व पोलीसांच्या घरांच्या दुरूस्ती करण्यामागे जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांचा मोठा सहभाग आहे. पोलिसांच्या चारचाकी, दुचाकी वाहनांच्या खरेदी व दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळात तरतुद केली आहे. इतर कोणत्याही विभागाच्या वाहन खरेदी अथवा दुरूस्ती साठी तरतुद नसल्याचे ते म्हणाले. फिर्यादी ला प्रत्येक पोलीस ठाण्यात चांगली वागणूक द्या. पिडीतांना पोलीस ठाणे हक्काचे ठिकाण वाटले पाहिजे. आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यावर खुर्चीत बसायची हिंमत होता कामा नये.
केसरकर पुढे म्हणाले, पोलीस हेडकाॅन्टेबल यांच्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर हाॅस्टेल उभारण्याचा प्रयत्न आहे. तसे माॅडेल बनवण्याचे काम सुरू आहे. पोलीस पाटील व होमगार्ड यांच्या ब-याच समस्या आपण मिटवलेल्या आहेत.

box…संघटीत गुन्हेगारांवर मोक्का लावा
कोल्हापूर जिल्ह्य़ातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी तेथील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संघटीत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे. याच धर्तीवर आपणही अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर असणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी छोटी पोलीस स्टेशन राबवण्याचा विचार सुरू असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. तर सिंधुदुर्ग 100 टक्के गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केल्या.

box…यांना केला मुद्देमाल सुपुर्द
जिल्हयातील ज्या नागरिकांचा रोख रक्कमेसह चोरीला गेलेला मुद्देमाल पोलीस विभागाने गुन्ह्यांची उकल करत ताब्यात घेतलेला 30 लाख रूपयांचा मुद्देमाल पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते फिर्यादींना सुपुर्द करण्यात आला. मुद्देमाल सुपुर्द करणा-यांमध्ये जानकी आंगणे- 9 हजार 500 रूपये, भागोजी गावडे- 2 लाख 37 हजार, सानिका माळवदे 3 हजार रुपये, संतोष गवस 75 हजार, मिताली गावडे 24 हजार 400, सुनिल प्रभुलकर 60 हजार, विजय सावंत यांची 5 लाख किंमतीची जेसीबी, विशाखा खवणेकर 79 हजार, सुनिल खडये 4 लाख रूपयांची स्विफ्ट कार, अक्षय माणगावकर जेसीबी यांचा मुद्देमाल संबंधीतांना सुपुर्द करण्यात आला.

11

4