वैभववाडी बस स्थानक परिसरात डांबरीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरू

320
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदार नितेश राणेंनी स्वखर्चातून बसस्थानक डांबरीकरणाचे काम घेतले हाती

वैभववाडी बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडून प्रचंड चिखल निर्माण झाला होता. चिखलातून एस. टी. बसमध्ये चढताना प्रवाशांचे हाल होत होते. बसस्थानक चिखलमुक्त करण्यासाठी आ. नितेश राणे यांनी स्वखर्चातून बसस्थानक परिसर डांबरीकरण व सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत वैभववासियांमधून त्यांचे आभार व्यक्त होत आहे.
वैभववाडी बसस्थानकातून दिवसभर बसेसची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. या दुरावस्थेबाबत प्रवाशात तीव्र संताप व्यक्त होत होता. सोमवारी १९ ऑगस्ट रोजी आ. नितेश राणे यांनी बसस्थानक परिसराची पहाणी केली होती. कोणत्याही शासकीय योजना, निधीची वाट न बघता तसेच प्रशासनावर ही जबाबदारी न ढकलता आ. नितेश राणे यांनी स्वखर्चातुन बसस्थानक डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामाचा शुभारंभ वैभववाडी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, न. पं. विषय समिती सभापती संतोष पवार, महिलाध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती शुभांगी पवार, नगरसेवक रविंद्र तांबे, प्रकाश पाटील, दिपक गजोबार, रोहीत रावराणे, वाहतूक नियंत्रक संजय भोवड, श्री शेळके आदी उपस्थित होते.
सहा महिन्यापासून वैभववाडी बसस्थानकाचे कामकाज नविन जागेतून सुरू करण्यात आले आहे. परंतु पावसाळा सुरू होताच बसस्थानक परिसर चिखलमय झाला. बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे, दलदल व चिखलाचे साम्राज्य होते. त्यामुळे प्रवाशांना एसटीमध्ये चढता, उतरताना कसरत करावी लागत होती. काही प्रवाशांनी या परिस्थितीला कंटाळून खाजगी वाहतूक सेवेला पसंती दिली होती. एकुणच दुरावस्थेबाबत वैभववाडीत तीव्र संताप व्यक्त होत होता. नुकताच पार पडलेल्या गप्पा विथ आमदार या कार्यक्रमात युवकांनी बसस्थानक दुरावस्थेचा प्रश्न आ. नितेश राणे यांच्या समोर उपस्थित केला होता. दरम्यान लवकरच हा प्रश्न निकाली निघेल असे आ. नितेश राणे यांनी सांगितले होते. सोमवारी आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शांतता कमिटी बैठकीत एस.टी. बसस्थानक दुरावस्था विषय परत चर्चेत आला होता. दरम्यान आ. नितेश राणे यांनी बसस्थानक परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली होती. बुधवारी बसस्थानक परिसर डागडुजी, डांबरीकरण व सुशोभिकरण या कामाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला दगड व खडीचा थर अंथरूण उंची वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर डांबरीकरण करण्यात येत आहे. पुढील दोन दिवसात बसस्थानक प्रवाशांसाठी निर्धोक होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक दुरावस्था हा प्रश्न मार्गी लागत असल्याने तालुकावासियांना दिलासा मिळणार आहे. तसेच सुरु असलेल्या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

\