महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर अदा…

2

देवगड संघटनेच्या पदाधिका-यांनी मानले आमदार वैभव नाईकांचे आभार…

देवगड ता.२१: महावितरणच्या जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांचे रखडलेले दोन महिन्यांचे मानधन आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कंत्राटी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.याबद्दल येथील कंत्राटी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन राघव यांनी आज कणकवली विजय भवन कार्यालयात श्री.नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
महावितरणच्या जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे मानधन रखडले होते.या कंत्राटी कर्मचार्‍यांनी हा प्रश्न श्री.नाईक यांच्याकडे मांडला होता.त्यावर त्यांनी तात्काळ महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.पाटील यांच्याशी संपर्कसाधून कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे तीनशे पैकी दोनशेहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांच्या खात्यात मानधन जमा झाले आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांचे मानधन आज पर्यत कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे रखडलेले मानधन श्री.नाईक यांनी मिळवून देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल येथील कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.

0

4