अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त; पाठलाग करून सावंतवाडी पोलिसांनी केली कारवाई…
सावंतवाडी ता.२१ बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी वेगुर्ले-गाडीअड्डा येथील एकाला ताब्यात घेतले असून २ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज दुपारी आरोंदा दूरक्षेत्राच्या परिसरात तेथिल पोलिसांनी पाठलाग करून केली.याप्रकरणी लक्ष्मीप्रसाद मांजरेकर (३५) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोंदा पोलीस दूर क्षेत्रावर तपासणी करण्यासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अल्टो कार संशयास्पदरित्या येताना दिसली.त्यांनी त्या गाडीला थांबण्याचा इशारा केला.मात्र चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांना संशय आला.अखेर त्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला.व गाडी पकडली असता गाडीत तब्बल १ लाख 64 हजार रुपयाची गोवा बनावटीची दारू असल्याचे आढळून आले.याप्रकरणी मांजरेकर याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर अवैद्यरित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस कर्मचारी महेश जाधव,प्रसाद कदम व गजानन नाईक यांनी केली.